Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना योद्धयांचे धरणे आंदोलन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना योद्धयांचे धरणे आंदोलन

जळगाव(प्रतिनिधी)- कोरोना महामारीत संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबाॅय, डाटाएन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक इत्यादी कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे या मागणीसाठी लढा उभारण्याचा निर्णय कोरोना योद्धयांच्या अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी कोरोना योद्धयांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोना काळात आमदार, खासदार,मंत्री, लोकप्रतिनिधी जिवाच्या भीतीने घरी बसले असताना कोरोना रुग्णांच्या सेवा शुश्रुषा करणारे शासकीय रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कोरोना योद्धयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय शासनाला घेण्यास भाग पाडू.संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी न्याय हक्कासाठी कोरोना योद्धयांनी संघटीतपणे आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली असून आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने या पदावर कोरोना योद्धयांना सामावून घेतले पाहिजे.यासाठी शासनावर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकावा लागेल. छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, हरिश्चंद्र सोनवणे, इंजि.एच.एच. चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष निलेश बोरा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चंदन बिऱ्हाडे, भारत सोनवणे, सुधाकर पाटील, सतीश सुर्वे यांच्यासह कोमल बिऱ्हाडे, प्रिया वाघ,अक्षय जगताप, बापूसाहेब पाटील, कुवरसिंग पावरा, युवराज सुरवाडे, भाग्यश्री चौधरी, प्रतीक्षा सोनवणे, शिला सपकाळे, दिपाली भालेराव,‌ ऐश्र्वर्या सपकाळे, मंदाकिनी विंचूरकर, मो.आमिर शेख, निशा तापकिरे,जयवंत मराठे, जितेंद्र चौधरी, कृष्णा सावळे, सुनील परदेशी, डॉ.प्रसन्न पाटील, गणेश सोनवणे, नदीम बेग दानिश बागवान, पवन पाटील, मनोज सावकारे, चंद्रशेखर पाटील, समाधान शिंगटे, प्रशांत नेवे, किशोर भोई यांच्यासह जिल्हाभरातील कोरोना योद्धे बैठकीला उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून अंतर्नादने दिला १७५ विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले

Next Post

सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post
सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo