<
विद्यार्थी म्हणजे विद्यार्जन करणारा. पण आताचा विद्यार्थी पाहिला की का अर्थ चुकीचा तर नाहीना हेच मनात येते. ते मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे पाहुन कळतच नाही की विद्यार्जन करणारा आहे की ओझे वाहणारा आहे. कडू आहे पण सत्य आहे. असचं आठवताना मला रबर बँड ची आठवण येते किती लवचिक, किती तन्यता त्याला वाहहह.. पण त्या लवचिकतेलाही त्या तन्यतेलाही अंत आहे. त्या रबर बँडच्या क्षमतेपेक्षा जर त्याला ताणले गेले. तर क्षणातच ते रबर बँड तुटते. मित्रानो आपला पाल्य, आपला विद्यार्थी आपण रबर बँड तर समजत नाहीय ना? ही चाचपण्याची वेळ आली आहे. काय एवढी स्पर्धा हो? मी म्हणतो काय एवढा हेवा हा? शाळेतून घरी आला की नाही आला. लगेच क्लास ची तयारी. त्या क्लास वरून आला की स्पेशल क्लास, तिथून आला की अभ्यासाला… काय…?… काय चाललंय हे? अरे तो पण मनुष्य आहे. मशीन नाहीय तो.. ! पण आपलं कस झालाय ना.. ! तो शेजारचा राज जातोय ना मग जा तू पण तो ते करतोय ना ! मग कर तू पण त्याने परीक्षेत एवढे मार्क मिळवले ना मग मिळावी की तू पण! तो हुशार तू गाढव ! बस… बस करा मित्रानो त्याचा बालमनाला समजून घेण्याची गरज आहे.तुम्हाला त्याचा माणूस घडवायचा आहे की मशीन? प्रत्येक मुलाची क्षमता ही वेगवेगळी असते प्रत्येकात काही ना काही नविन कौशल्य पण असते सर्वच मुलं सारखी नसतात ही समजून घेण्याची गरज आहे.तुम्हाला कशाला पाहिजे हो दुसऱ्याची कॉपी जे आहे ते ओरिजिनल राहू दया ना !कशाला चढाओढ ही बिनकामाची? हो बिनकामाचीच… मी तरी बिनकामाचीच म्हणेन.! मला मान्य आहे. स्पर्धेचं युग आहे.प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा बघायला मिळत आहे. म्हणून आपण बालमन न जोपासता ओझे लादून मानसिक दाब वाढवून मशीन बनवण्याचा प्रयत्न का करावा? हा प्रयत्न यशस्वी होईलही. पण तुमच्या हातात येईल ती फक्त एक मशीन.! हो मशीनच कारण मशिनिला मन नसते. तिला असतात फक्त वेगवेगळे भाग.दुसऱ्याच्या इच्छेनुसार हालचाल करणारे.असे भाग जे बटण चालू केलं की चालू होणारे आणि बटण बंद केलं की बंद होणारे.तुम्ही गमावून बसणार तुमचं पाखरू. जे उडत होत मस्त स्वछंद वावरत होत. हसत होत, घरात बेधुंद फिरत होत. उनाडक्या मस्ती करत होत. उडण्या बागळण्याच्या त्याच्या या वयात असताना तुमच्या अति कुशल प्रयत्नांनी वेळेत धावणारी घड्याळ होऊन बसलं. भावना शून्य असं. स्वतः स्वतःतच राहणारा, स्वतःशी बोलणारा, एकट्यात खेळणारा असा. म्हणून मित्रांनो-पालकांनो-शिक्षकांनो विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून विचार करा. त्यालाही मन आहे ते जपा. उगाच अभ्यासाची चढाओढ करू नका. त्याला कोणाशी तोलू नका.तो जसा आहे तसा ओरिजिनलचं चांगला आहे. आणि हे बघा मित्रांनो ओरिजिनल आणि झेरॉक्स यामध्ये ओरिजिनलचं बहुमोल असते. झेरॉक्स किंवा कॉपी हा एक कोरा कागदचं असतो ज्यावर फक्त कॉपी-पेस्ट केलेले असते ते छापून आलेले असते.नसतात त्यावर विविध रंगछटा. कारण मित्रानो ते कॉपी झालेलं आहे. आणि हे कॉपी झालेलं आहे.आणि हे निरंतर टिकणार नसतं. कालांतराने रंग निघून पडतो, पुसट होते आणि उरतो तो कागद तसाच कोरा पण घाव सहन करत जीवन जगलेला एकटा.
-मनोज भालेराव ,(शिक्षक) प्रगती विद्यामंदिर, जळगांव,मो.न. 8421465561