पाळधी/जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या ३री ते ५वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या चेअरमन सौ.अर्चना सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येथील भाजीपाला मंडईला भेट दिली. यातून विद्यार्थ्यांना विविध भाज्यांविषयी तसेच त्यांच्या उपलब्धतेपासून ते भाव-ताव पर्यंतची माहिती विद्यार्थ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांकडून मिळवली. यावेळी शाळेच्या चेअरमन यांना या उपक्रमाबद्दल विचारले असता, विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारीक ज्ञान देखील अवगत झाले पाहिजे. या हेतूने हा उपक्रम शाळेमार्फत राबवण्यात आला आहे, असे यावेळी बोलताना सांगितले. बाजारातील विक्रेत्यांनी विद्यार्थांचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर यांच्यासह प्रशांत सुर्यवंशी सर, उज्ज्वला झंवर, विजया मोरे, नयन आरखे, गुणवंत पवार, प्रतिभा शिवदे, सतिष पाटील यांनी परिश्रम घेतले.