Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उद्घाटनाच्या दिवशीच कापसाला 7101 रुपये प्रतिक्विंटल भाव; श्री गजानन जिनिंग मध्ये नवीन कापूस खरेदीचा शुभारंभ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
उद्घाटनाच्या दिवशीच कापसाला 7101 रुपये प्रतिक्विंटल भाव; श्री गजानन जिनिंग मध्ये नवीन कापूस खरेदीचा शुभारंभ

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- येथील श्री गजानन जिनिंग & प्रेसिंग फॅक्टरी , गिरड रोड , पाचोरा च्या आवारात नवीन कापूस खरेदीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आला.

उद्घाटनाच्या दिवशीच कापसाला 7101 रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी झाली. येथील नगर परिषदेच्या माजी नगरसेविका लताताई राजाराम सोनार यांच्या शुभहस्ते काटा पूजन व बाजार समितीचे संचालक संजय सिसोदिया यांच्या हस्ते कापूस पूजन करून नवीन हंगामाच्या कापसाची खरेदी करण्यात आली.

याप्रसंगी शेख यासीन बागवान, राजाराम सोनार, श्री गजानन जिनिंग संचालक प्रमोद शेठ सोनार, डॉ. दिनेश सोनार उपस्थित होते. महाराष्ट्रात कापसाला 6 हजार रुपयांचा शासकीय हमीभाव देण्यात आला असून त्यापेक्षा जास्तीचा म्हणजे 7101 रुपये प्रतिक्विंटल भाव आजपासूनच खुल्या बाजारात देण्यात आला. पाचोरा येथील श्रीगजानन जिनिंग मध्ये हमी भावापेक्षा जास्त रकमेने व रोखीने कापूस खरेदी सुरू करण्यात आल्याने पाचोरा भडगाव परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्री गजानन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी मध्ये सिल्लोड येथील यासीन बागवान तसेच संजय सिसोदिया, डी एन पटेल, रोहित अग्रवाल यांच्या संयुक्त फर्म तर्फे कापसाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याला सर्वश्री नारायण पटेल, रमेश भाई पटेल, अमीन बागवान, राहुल तायल किरण जैन, गोपीचंद पाटील, शरीफ बागवान, योगेश राजपूत, जुबेर पठाण, ईमरान शहा, गफ्फार देशमुख, इलियास बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

शुभमुहूर्तावर कापूस विक्रीसाठी आलेले कापूस विक्रेते शेतकरी राउफखा अय्युबखा, गोविंदा चौधरी, सुरेश चव्हाण यांचा श्री गजानन जिनिंग तर्फे शाल,टोपी रुमाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मानकी चे सरपंच संजय पाटील , राहुल पाटील, अंतुरली येथील भैय्या पाटील, संजय दीक्षित, दीपक पाटील व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंदन गायकवाड, संजय खेडकर, काशिनाथ पाटील, संजय कुमार, अमोल राजपूत , अनिकेत मिस्त्री, भूषण वाडेकर, सचिन तेली आदींनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

जिल्ह्यातील 10 गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

Next Post

नातेही विसरला नराधम! 16 वर्षीय पुतणीवर केल गैरकृत्य

Next Post
नातेही विसरला नराधम! 16 वर्षीय पुतणीवर केल गैरकृत्य

नातेही विसरला नराधम! 16 वर्षीय पुतणीवर केल गैरकृत्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo