<
जामनेर(शांताराम झाल्टे)- जामनेर तालुक्यातील मालदाभाडी या गावामध्ये राहणाऱ्या नागरीकांना गेल्या चार पाच वर्षापासून अनेक प्रमाणात या शेतकऱ्याच्या बांधातून येणाऱ्या दुषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. अक्षरशा शेतातील पाणी घरात शिरुन येथील गरीब व दिनदुबळ्या लोकांना प्रत्यक्ष घरातील पाणी उपसण्यासाठी अक्षरशा मोटरने काढावे लागत आहे.
या शेतकऱ्या पासून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कायमची सुटका कशी दूर होईल असा प्रश्न नागरिकांपुढे येत आहे. येथील ग्रामपंचायतीचे सरपंचानी लवकरात लवकर दखल घ्यावी व गरिबाचे नुकसान भरपाई साठी न्याय करावा असे नांगरिकांमध्ये बोलले जात आहे.
नागरीकांच्या समस्या दिवसांदिवस वाढत असल्याने या वर्षी सुद्धा मोठया प्रमाणात शेताच्या बंधाऱ्या जवळील असलेले घरोघरात पाणीच पाणी साचलेले दिसून येत असून येथील नागरिकांचे अन्नधान्य, घराच्या भिंती कमकुवत, जागोजागी साचलेले दुषित पाणी, या गावातील अनेक समस्यांना गरिब जनते मध्ये परेशानी वाढत आहे. ग्रामपंचायतीचे सरपंचानी ताबडतोब भूमिका घ्यावी अशी नागरिकांची तक्रार या मालदाभाडी गावात होत आहे.
जागोजागी खडडे बसस्टाप जवळ साचलेल्या पाण्याने संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य मालदाभाडी या गावात दिसून याची पाहणी शिवसेना जिल्हा नेते मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे व शेतकरी सेना गट प्रमुख तुकाराम गोपाळ यांनी केली. प्रत्यक्ष ग्रामसेवकला जागेवर बोलाऊन नागरिकांच्या तक्रारी समजून घेतल्या व सरपंच यांच्याशी संवाद साधून नागरीकांच्या समस्या सोडविण्याचे मार्गदर्शन केले. घटनेस्थळी ठिकाणी जामनेर तहसीलदार येऊन नागरिकांच्या नुकसानभरपाई ची सकल चौकशी करावी अशी मागणी आम जनतेमध्ये होत आहे.