Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मध केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
मध केंद्र योजनेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन


जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 15 – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशीपालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती/संस्थाकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.


या योजनेत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण मिळणार असून साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्टे आहेत.
वैयक्तिक मधपाळ अर्जदार हा साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ किमान 10 वी पास, वय वर्ष 21 पेक्षा जास्त, असा व्यक्तिच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.


केंद्रचालक संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेल्या सेवा असाव्यात.
आग्या मध संकलन प्रशिक्षण व संच किट वाटपकरीता पारंपारिक कारागिर असावा, 5 व्यक्तीचा 1 समुह असावा, वय 18 वर्षापेक्षा जास्त व लिहिता वाचता, येणारा असावा. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, कार्यरत/सेवानिवृत कर्मचारी व इतर सर्व अटी व शर्ती लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंधपत्र व इतर पुर्तता पुर्ण करुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी केंद्रचालक 20 दिवस निवासी प्रशिक्षण महाबळेश्वर येथे व मधपाळ निवासी प्रशिक्षण 10 दिवस जिल्हास्तरावर घेणे अनिवार्य राहील. आग्या मध संकलन व विशेष/छंद प्रशिक्षण निवासी 5 दिवस जिल्हास्तरावर घेणे बंधनकारक असेल.


अधिक माहितीसाठी जिल्हा गामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, आय.टी.आय, जळगाव दुरध्वनी क्रमांक- 0257/2252971, मोबाईल 9623578740 यांचेशी तसेच संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. 5, मु. पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा-412 806, दुरध्वनी क्रमांक- 02168/260264 वर संपर्क साधावा. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

Next Post

रक्तदान शिबीरानिमित्त मुख्यमंत्री यांनी केले लोकमत वृत्तपत्र समूहाचे अभिनंदन

Next Post

रक्तदान शिबीरानिमित्त मुख्यमंत्री यांनी केले लोकमत वृत्तपत्र समूहाचे अभिनंदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d