<
जामनेर(शांताराम झाल्टे)- माजी मंत्री आ. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने जामनेर भाजपातर्फे ओबीसींवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तहसील जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती पण या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल डेटादिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध या पुढे ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
सदर निवेदना मार्फत आम्ही अशी विनंती करतो कि जो पर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेण्यात येऊ नये, असे निवेदन जामनेर तहसीलदार यांना देण्यात आले यावेळीचंद्रकांत पाटील भाजपा तालुकाध्यक्ष, भाजपाओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष वासुदेव घोंगडे, अतिष झाल्टे, दिपक तायडे, राजेश पाटील, रामकिसन नाईक, सुरेश बोरसे, खलील रमजान खान, शरद पाटील, कमलाकर पाटील, ऊदल नाईक, राजधर पांढरे, बाळू चव्हाण, मगन पारधी, आनंदा पीठोडे, संजय देशमुख, बाबुराव हिवराळे, तुकाराम निकम, नजीम पार्टी, नाना वाणी, अशोक भोयर, समाधान पाटील,चंद्रशेखर काळे, शैलेश गिल, अमोल पाटील, योगेश पाटील यासह तालुका भरातील ओबीसी बांधव उपस्थित होते.