<
जळगांव(चेतन निंबोळकर)- अमळनेर तालुक्यातील सबगव्हान गावाचे रहिवासी भाऊसाहेब भालचंद्र पाटील हे एन.टी. मुंदडा विद्यालय,अमळनेर येथे 40% अंशता अनुदानीत तुकडीवर कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत परंतु शासनाच्या आडमुठे धोरणामुळे हक्काचा पगार मिळत नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. लवकरच 100% प्रचलित पद्धतीने अनुदान मिळावे म्हणून आवडत्या बाप्पाला परिवारासह साकडे घालत त्यांनी पत्नी वैशाली पाटील व मुलगी काव्या सह आपल्या कॅमेऱ्यात लाडक्या बाप्पासोबत एक सेल्फी कैद केला