<
जामनेर(शांताराम झाल्टे)- येथील एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पत्रकारांच्या महिलांना अपशब्द वापरून पत्रकारांना घरातून बाहेर काढून मारेल असे वक्तव्य केल्याने खळबळ माजली आहे. सदर पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी असे निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने उपजिल्हा प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की,काही दिवसांपूर्वी जामनेर येथील दोन पत्रकार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा एका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या विनंती वरून बातमी घेण्यासाठी गेले होते.जाण्यापूर्वी सदर पत्रकारांनी केवळ पेट्रोल पाण्याचा खर्च द्यावा लागेल असे म्हटले. सदर ठिकाणी वृत्तसंकलन करण्यासाठी गेल्यावर तिथल्या लोकांनी पत्रकारांना पेट्रोलसाठी खर्च दिला. सदरची माहिती जामनेर येथील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कानावर पडली. सदर शिवसेनेच्या”त्या”पदाधिकाऱ्याने दोघा पत्रकारांना फोनवरून झापले. तसेच पत्रकारांच्या महिलां विषयी अपशब्द वापरत एक-एक पत्रकाराला घरातून बाहेर काढून मारेल असे वक्तव्य केले.
शिवसेनेच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने असे पत्रकारां विषयी बेताल वक्तव्य केल्याने तालुक्यातील पत्रकार बांधवा मध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारांना असे धमकावन्याचे प्रकार घडत असून राज्य सरकारने अश्याप्रकारे पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेजबाबदार पदाधिकाऱ्यांना “लगाम” लावण्याची गरज निर्माण झाली आहे.जामनेर येथील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने जामनेर येथील पत्रकारांच्या महिलां विषयी बेताल वक्तव्य करत एक-एक पत्रकाराला घरातून बाहेर काढून मारेल असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने शहरासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवां मध्ये संतापाची लाट उसळली आहे.सदर शिवसेनेच्या “त्या” बेजबाबदार पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निर्भिड पत्रकार संघ(जळगांव जिल्हा) वतीने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख-डॉ-मनोहर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
“त्या”पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख-डॉ. मनोहर पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना दिले. सदर “त्या” पदाधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास निर्भिड पत्रकार संघ महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष-सुनिल इंगळे यांनी म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी निर्भिड पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष-सुनिल इंगळे, जिल्हा सचिव-दादाराव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष-रत्नाकर जोहरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख-अनिल शिरसाठ,तालुका अध्यक्ष-काशिनाथ शिंदे, शांताराम झाल्टे, मिनाताई शिंदे नितीन इंगळे, करण साळुंखे, गोपाल जाधव, सुनिल सुरवाडे, नसीम शेख यासह असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.