<
जामनेर(शांताराम झाल्टे)- मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प.जळगांव डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, बालविकास प्रकल्प अधिकारी आय.सी.गोयर, पद्मसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली उपकेंद्र अंतर्गत मौजे शेवगा येथे किशोरवयीन मुलीच्या रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करण्यात आली.
यामध्ये 19 गरोदर माता आणि 83किशोरवयीन मुलींची तपासणी करून त्यांना जंतनाशक गोळ्या व लोहयुक्त गोळ्याचे महत्त्व समजावून वाटप करण्यात आले. लोहयुक्त आहारा विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य तपासणी प्रसंगी आरोग्य सेविका कालिंदा सानप, आरोग्य सेवक पी.एस.मोरे, आशा स्वयंसेविका आशा भोर, अंगणवाडी सेविका राजश्री जाधव, बेबाबाई सुरळकर, अंगणवाडी मदतनीस जयश्री राठोड, शाबीरा तडवी यांनी अनमोल सहकार्य केले.