Thursday, March 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
17/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे(प्रतिनिधी)- सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपाध्यक्षा प्राध्यापक मेधा कुलकर्णी, नगरसेवक जयंत भावे आणि सायकलपटू उपस्थितीत होते.सायकल रॅलीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा केला. सायकलचा दैनंदिन जीवनात वापर निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरण्यासोबत पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लागतो.राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते ट्रायथलेट कौस्तुभ राडकर,सायकलपटू सुनीता नाडगीर, एकादशी कोल्हटकर, निरुपमा भावे,जुगल राठी, ट्रायथलेट आणि ट्रेकर निलेश मिसाळ,योग प्रशिक्षक आरती चव्हाण, आयर्नमॅन मेघ ठकार आणि आयोजकांचा सत्कार करण्यात आला.

प्रस्ताविकात प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, पुणे हे सायकलिंचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात सायकल प्रेमी आहेत. पुणे शहर पर्यावरणपूरक व्हावे, शहराचा शाश्वत विकास व्हावा, महिला सुरक्षित रहाव्यात, या प्रेरणेने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Next Post

कोणत्याही धर्माचे असले तरी त्यांना त्यांचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे -अलाहाबाद उच्च न्यायलय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d