<
मुंबई(प्रतिनिधी)- देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
या पुरस्कारासाठी व्यक्ती अथवा संस्थेने नामांकने पाठविण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ.भि.मोरये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.राष्ट्रीय एकात्मता दिन 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. व्यक्ती अथवा संस्था यांनी आपल्या कार्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग 31 ब यांच्याकडे पाठवावयाची आहे.
या पुरस्कारासाठी कोणतीही भारतीय नागरिक वा भारतातील संस्था किंवा संघटना व्यक्ती अथवा संस्थेचे नामांकन करू शकतात. या पुरस्कारासाठी नागरिकांनी नामांकने पाठवावीत असे आवाहनही श्री. मोरये यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.