<
मुंबई(प्रतिनिधी)- पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे मानद प्राध्यापक, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. टी. पद्मनाभन यांनी भौतिक आणि खगोल विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधनानं भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या संशोधनात्मक पुस्तकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावली.
उदयोन्मुख वैज्ञानिकांना संशोधनाची दिशा दाखवली. भारतीय जनमानसात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनान भारतीय भौतिक, खगोल विज्ञान क्षेत्रातील अभ्यासकांचा मार्गदर्शक हरपला आहे. वैज्ञानिक जगताची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. टी. पद्मनाभन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.