<
चाळीसगाव(प्रतिनिधी)- आजच्या धावपळीच्या आयुष्यात आई वडिलांप्रति असलेले प्रेम खऱ्या अर्थाने नवीन पिढीसाठी गुलदस्त्याचा विषय झाला आहे. परंतु, खेडगावच्या साळुंखे परिवाराने समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
खेडगाव येथील जगतराव अमृतराव साळुंखे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून अतिशय नाजूक परिस्तिथीचा सामना करत त्यांनी आपल्या चारही मुलांना उच्चशिक्षित करून एक आदर्श कुटुंब घडविण्याचा मान मिळवला आहे. जगतराव आबांचा जेष्ठ चिरंजीव सुनील जगतराव साळुंखे हे धामणगाव येथे प्रसिद्ध सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. द्वितीय सुपुत्र बाळासाहेब जगतराव साळुंखे हे खेडगाव येथे वैद्यकीय व्यवसाय करून गावाची सेवा करतात. तृतीय सुपुत्र डॉ. अनिल जगतराव साळुंखे हे चाळीसगाव येथे सुप्रसिद्ध गायत्री डायग्नोस्टिक(MD पॅथीलॉजी) असून वैद्यकीय सेवा देत असतात तर चतुर्थ सुपुत्र श्री विलास जगतराव साळुंखे हे देखील DMLT करून वैद्यकीय सेवा बजावत आहेत.
मुलांनी देखील आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याच्या उद्देशाने वाढदिवसाच्या निमित्त वडिलांना 75 वर्ष सुखरूप पूर्ण केल्याबद्दल चाळीसगाव येथे राजपूत मंगल कार्यालय येथे दिनांक 15 सप्टेंबर रोजी सर्व नातेवाईक, मित्र मंडळ आप्तेष्ट यांना आमंत्रित करत वडिलांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आयोजित करत वडील, मोठे काका, आत्या या सर्वांचा सत्कार करीत विधीवत औक्षण करीत उपस्थितांसमोर एक अभूतपूर्व सोहळा संपन्न केला. अश्या ह्या उच्चविद्याभूषित मुलांनी आई वडिलांप्रति असलेले प्रेम वास्तल्य बघून कार्यक्रमाबद्दल सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.असा आदर्श समाजातील अनेक तरुणांनी घ्यावा व आपल्या आई वडिलांबद्दल कृतज्ञात व्यक्त करावी अशी चर्चा या कार्यक्रमामुळे नागरिक करत आहेत.