<
जामनेर(शांताराम झाल्टे)- जामनेर पोलिस स्टेशनला शिवसेनेच्या त्या पदाधिकाऱ्यावर कलम ५०४/५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर येथील पत्रकार शांताराम झाल्टे व पत्रकार नितीन इंगळे यांनी जामनेर पोलिस स्टेशन येथे शिवसेना पदाधिकार्यावर गुन्हा दाखल केला असून सदर माहिती अशी की गेल्या तीन दिवसा अगोदर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पत्रकारां विरुद्ध शिवीगाळ करून घरात घूसून मारण्याची धमकी दिली व त्यांच्याच पक्षाच्या व्यक्तिशी बोलून पत्रकारांच्या आई बहीण बद्दल अपशब्द वापरून अँडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल केली. या संदर्भात आज रोजी पोलीस निरीक्षक कीरण शिंदे यांनी ती अँडीओ क्लीप स्वता ऐकून त्या पदाधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
आज रोजी जामनेर शिवसेना पदाधिकाऱ्यावर कलम ५०४ व ५०६प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित निर्भिड संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल इंगळे, MJN न्यूजचे संचालक दादाराव वाघ तसेच संपादक मिना शिंदे, दैनिक गावकरीचे प्रतिनीधी अनिल शिरसाठ, सुतार जनजागृती संस्थेचे उपजिल्हा प्रमुख गोपाल जाधव, साहेबराव साळुंके उपस्थित होते.