<
जळगाव(प्रतिनिधी)- सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्रींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे, याठिकाणी कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये, याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव सज्ज झाला असून वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र आणि जीवरक्षक शोध व बचाव पथक तसेच निर्माल्य संकलनासाठी श्री सेवकासह 40 जणांचे पथक मेहरुण तलाव परिसरात सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांच्या नेतृत्वात रविवार, 19 सप्टेंबर रोजी पूर्णवेळ हे पथक कार्यरत राहणार आहे. या शोध व बचाव पथकास जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बोट उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात 10 पट्टीचे पोहणारे प्रशिक्षित जीवरक्षक तैनात राहणार आहेत. तर अमन गुजर हे ड्रोनद्वारे परिसरावर सतत नजर ठेवून असणार आहेत. असे संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, बाळकृष्ण देवरे यांनी कळविले आहे.
मेहरूण तलावात श्रींच्या विसर्जन दरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, या अनुषंगाने दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शोध व बचाव पथक तैनात केले जाते. त्यानुसार यावर्षीही हे पथक तैनात राहील. याचबरोबर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तही तैनात राहणार आहेत.
असे राहील नियोजन
जीवरक्षक पथक – नरवीर सिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, योगेश गालफाडे, ऋषी राजपूत, शीतल शिरसाळे, अजीम काझी, बबलू शिंदे, राजेश सोनवणे, सतीश कांबळे, रितेश भोई, चेतन भावसार, रवींद्र फालक तसेच मनपा अग्निशमन विभाग जीवरक्षक पथक देखील तैनात राहणार आहेत. हे सर्व जीवरक्षक सकाळपासून रात्री विसर्जन पूर्ण होईपर्यंत बोट घेऊन मेहरुण तलावात गस्त घालून नागरिकांना सूचना देतील.या परिसरात साप, विंचू यांचा अधिवास असल्याने अचानक सर्प दृष्टीस पडल्यास नागरिक घाबरून धावपळ करतात, यावर पर्याय म्हणुन वन्यजीव संरक्षण संस्थेचे 10 सर्पमित्रही याठिकाणी तैनात राहणार आहे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 7709776446/ 9028308365 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
सर्पमित्र पथक- जगदीश बैरागी, अभिषेक ठाकूर, सुरेंद्र नारखेडे, निलेश ढाके, शुभम पवार, दुर्गेश आंबेकर, दिनेश कोळी, बापू कोळी, किरण सपकाळे, वासुदेव वाढे, गणेश सोनवणे हे राहतील.
निर्माल्य संकलन श्री सेवक- तलावात निर्माल्य जाऊ नये तसेच लहान मुले काठावर जाऊ नये, यासाठी 20 जणांचे पथक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात निर्माल्य संकलनासाठी तैनात राहणार आहे. नागरिकांनी निर्माल्य या पथकाकडे जमा करावे.या पथकात प्रसाद सोनवणे, अरुण सपकाळे, जितेंद्र सोनवणे, भूषण चौधरी, गणेश सपकाळे, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, रवींद्र भोई, ललित शिरसाठे, तुषार रंध्ये, भुपेंद्र तळेले, गौरव शिंदे आदि सहभागी राहतील असे श्री. रावल यांनी कळविले आहे.