Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोऱ्यात शिवसेनेच्या महालसीकरणाला जनतेचा प्रतिसाद; ६५१९ नागरिकांना लाभ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
पाचोऱ्यात शिवसेनेच्या महालसीकरणाला जनतेचा प्रतिसाद; ६५१९ नागरिकांना लाभ

पाचोरा(प्रमोद सोनवणे)- शहरात शिवसेनेच्या वतीने पुन्हा एकदा शिवसेनेच्या कोविड १९ प्रतिबंधात्मक महालसीकरणाच्या महामेळ्यात पुन्हा एकदा नवीन उच्चांक प्रस्थापित करत ६५१९ नागरिकांना पहिल्या व दुसऱ्या लसींचा लाभ देत लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यात हातभार लावला आहे.

ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे पाचोरा शिवसेनेच्या वतीने विविध समाजपोयोगी उपक्रम राबवले जातात.त्याचाच एक भाग म्हणून सहा भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या काही दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती.त्यातच शहरातील विविध टोकाला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींना लस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते व तासंतास थांबावे लागत होते.

याची दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी प्रशासनाला सूचना करत शहरातील विविध भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार आज शहरातील जनता वसाहत, नागसेन नगर वाल्मिकी नगर आदी भागासाठी धमोदय बौद्ध विहारात,देशमुखवाडी व परिसरातील नागरिकांसाठी अहिरसुवर्णकार मंगल कार्यालयात,तसेच उपनगराध्यक्ष पती गंगाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रंगार गल्ली भागातील जनतेसाठी मोर भुवन मध्ये, तसेच कोंडावाडा गल्ली, बाहेरपुरा, त्रंबक नगर या ठिकाणी लसीकरण शिबीर संपन्न झाले.या सर्व ठिकाणी शिस्तबद्धरित्या नागरिकांना कोविड १९ लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहावयास मिळत होते.

दरम्यान शहरातील या विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन आ.किशोर पाटील, मुकुंद बिलदीकर,नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी लसीकरण ठिकाणी भेटी देत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले तर पप्पू राजपूत यांनी शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर भेटी देत प्रशासन व शिवसैनिकांमध्ये समन्वय साधला. शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत असून आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रती आभाराचे भाव उमटतांना दिसत आहेत.

महालसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सतीश चेडे, गंगाराम पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, सुमीत किशोर पाटील, बंडू चौधरी, प्रवीण ब्राह्मणे, संदीप राजे पाटील, सुमीत सावंत, महेश पाटील, सौरभ चेडे ,नगरसेवक दादाभाऊ चौधरी, राजू पाटील, छोटू चौधरी, गणेश पाटील, प्रमोद सोनार आदींनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

विसर्जनस्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग राहणार सज्ज; मेहरुण तलाव परिसरावर राहणार ड्रोनची नजर

Next Post

पाचोरा येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नियमानुसारच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल

Next Post
पाचोरा येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नियमानुसारच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल

पाचोरा येथील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नियमानुसारच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d