<
भडगांव(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील महिंदळे या लहान गावातील शेतकरी कुटूंबातील सुदाम परदेशी बनले ठाणे चे अप्पर जिल्हाधिकारी त्याच्या नियुक्तीचे सर्वच स्थरातुन अभिनंदन केले जात आहे परदेशी यांच्या अप्पर जिल्हाधिकारी नियुक्तीने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महिंदळे ता.भडगाव या लहानशा गावात सर्वसाधारण शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या सुदाम परदेशी यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी चे महिंदळे येथील शाळेत झाले या नंतर चे शिक्षण बारावी पर्यन्त चे भडगाव येथे झाले बारावी नंतर एमबीबीएस करून डॉक्टर बनुन ग्रामीण भागात जनतेची सेवा करावी हि प्राजल भावना मनाशी होती मात्र एमबीबीएस ला प्रवेश न मिळाल्याने राहुरी येथे बी.टेक.(कृषी अभियांत्रिकी) चे शिक्षण घेतले बी टेक केल्या नंतर मन राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कडे वळले या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होऊन तालुका, उपविभाग कींवा जिल्ह्यातील सर्व यंत्रणाचे पर्यवेक्षण व समन्वय करता येऊ शकते हि गोष्ट सराव परीक्षेच्या अभ्यासाच्या वेळी कळली.
मनाशी ठाम होत स्पर्धा परीक्षे चा अभ्यास करत यात यश गाठत १९९५ मध्ये मंत्रालय सहाय्यक १९९६ विशेष लेखा अधिकारी १९९६ उपअधीक्षक भूमिअभिलेख १९९७ मध्ये तहसीलदार अशा पध्दतीने दोन वर्षात वेगवेगळ्या परीक्षातून निवड झाल्यात १९९८ मध्ये तहसीलदार या पदावर पुणे महसूल विभागात सुदाम परदेशी रुजू झाले नी जुन्नर, कराड,दौंड येथे तहसीलदार म्हणुन आपला कार्यकाळ पुर्ण केला सन २००४/५ मध्ये कृष्णा कोयना नद्यांना आलेली पूरस्थिती तद्नंतर ची मदत या सर्व कामात उत्कृष्ट काम केल्याने उत्कृष्ट तहसीलदार म्हणुन गौरविण्यात आले.
या नंतर सन २००८ मध्ये पदोन्नती होत विशेष भूसंपादन अधिकारी (उल्लासखोरे प्रकल्प) प्रसंगी भूसंपादन चे काम वेळेत पूर्ण केले तद्नंतर उपविभागीय अधिकारी पनवेल, ठाणे म्हणुन उत्कृष्ट काम पाहिले सन २०१७ / १८ या वर्षासाठी उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून ना.एकनाथ शिंदे (पालकमंत्री ठाणे) यांचे हस्ते गौरविण्यात आले. अशा या उत्कृष्ट अधिकारी ला पदोन्नती मिळाली नी १३ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली सदर ची वार्ता भडगाव तालुक्यात पोहचताच आंनदोस्तव साजरा करण्यात आला.