<
जामनेर(शांताराम झाल्टे)- 17kv एक्सप्रेस नगरपरिषदेच्या फिल्टर प्लांटचे समारंभ गारखेडा येथे उदघाटन करण्यात आले. नगरपरिषदच्या सांडपाणी प्रक्रिया फिल्टर प्लांटसाठी लागणारे एक्स्प्रेस फिल्टर गारखेडा येथे देण्यात आले.
या प्लांट ची सेवा २४तास उपलब्ध राहणार आहे.असे या शुभारंभाप्रंसगी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष शरद पाटील, न.प.गटनेते डॉ.प्रशात भोंडे, जे.के.चव्हाण, मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, नगरसेविका संध्या पाटील, नगरसेवक आतिष झाल्टे, नाजीम पार्टी, बंटी वाघ, नाना वाणी, अनिस शेख, बाबुराव हिवराळे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.