<
जळगांव(प्रतिनिधी)- बैठकीमध्ये विविध प्रकारची माहिती उदाहरणार्थ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानभरपाई यासाठी जिल्हाध्यक्ष वैद्य गणेश घोपे आणि राज्य उपाध्यक्ष शेख गुलाब मामू व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी संपूर्ण जळगाव जिल्हा कार्यकारणी तालुक्या सहित आलेल्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती सर्वप्रथम अन्याय अत्याचार आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विषयी माहिती आणि भ्रष्टाचार विरोधी सखोल माहिती देऊन जळगाव जिल्हा व जिल्ह्यातील तालुके यांचे कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर केली.
जिल्हाध्यक्ष वैद्य गणेश घोपे, जिल्हा कार्याध्यक्ष हिम्मतराव पाटील, मुख्य सचिव विनोद बेरभैया, संपर्कप्रमुख अतुल महाजन, सल्लागार अँड प्रवीण पाटील, महानगराध्यक्ष दिलीप साळुंखे, महानगरसचिवआणि संपूर्ण तालुक्यातील यांना कामकाजाची शेख गुलाब मामू यांनी सखोल माहिती देऊन कामकाजाची पद्धत सांगितले.
तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना सलग एक लाख रुपयाची मदत शासनाने करावी जिल्ह्यातील नागरिकांना खुले आव्हान भ्रष्टाचार अन्याय आणि अत्याचार तसेच होत असेलतर आमच्या संघटनेच्या कुठल्याही जिल्हा किंवा तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची नागरिकांनी संपर्क करून होणाऱ्या भ्रष्टाचार अन्याय आणि अत्याचाराची माहिती देऊन आम्ही संघटनेचे पदाधिकारी दिलेल्या विषयावर विरूद्ध लढा देऊअसे खुले आव्हान जिल्हाध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी केले आहे.