<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुधीर महाले, जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे, कर्मचारी संघटनेचे अनिल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा सचिव प्रा. डॉ. नरेंद्र महाले, जिल्हा समन्वय समिती प्रमुख किशोर श्रीखंडे, जिल्हा निरीक्षक किरण नांद्रे, जिल्हाध्यक्षा कोकिळा चित्ते या मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व प्रथम संत सेना महाराज व जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या बैठकीतील चर्चा सत्रात 31 ऑगस्ट 2020 रोजी जळगाव येथे अ.भा. जिवा सेनेची स्थापना झाली त्या नंतर वर्षभरात संघटनेने केलेली कामे तालुक्यामधील कार्यकारणी पदाधिकारी नियुक्त अशा प्रकारे वर्ष भराचा आढावा घेण्यात आला व या पुढे याच जोमात जिल्ह्यातील राहिलेली तालुक्यामधील कार्यकारणी निवड करणे सामाजिक व शैक्षणिक नवनवीन उपक्रम राबवणे,9 ऑक्टोबर रोजी जिवाजी महाले यांची जयंती जिल्ह्यात साजरी करणे याबाबत चर्चा करण्यात आली.
समाजाचे संघटन वाढवण्यासाठी प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले उपस्थित मान्यवर, प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले यांनी संघटनेच्या धोरणात्मक चर्चा केली महिला संघटन वाढवणे, ग्रामीण भागात संघटनेचा प्रचार व प्रसार करणे या सोबत जिल्हा सचिव प्रा.डॉ नरेंद्र महाले यांनी संघटना स्थापन होऊन एक वर्ष झालं त्या एक वर्षाचा कार्याचा आढावा सोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे कार्य करावे यासंदर्भात रोखठोक शैलीमध्ये त्यांनी पदाधिकार्यांची मनं जिंकली. जिल्हा कार्याअध्यक्ष अनिल चौधरी यांनी संघटनेच्या नियमाबद्दल परखड विचार मांडले. नाभिक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी जिल्ह्यात नाभिक कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी संपूर्ण जिल्हाभर जीवा सेनेचे कर्मचारी जोडो अभियान राबवू असे सांगितले. जिवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे यांनी जिल्ह्यात जिवा सेना तळागाळातल्या समाज बांधवा पर्यंत पोहोचवण्याचे विचार व्यक्त केले. शैक्षणिक क्षेत्र व वैद्यकीय अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटन मजबूत करू, ग्रामीण भागात जिवा सेना जोमाने काम करेल सर्व जाती पोट जाती समाज जोडण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून केले जाईल अशा प्रकारे मान्यवरानी आपले अनमोल असे मार्गदर्शन केले.
समाजातील पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले जिल्हाभरातून जिवा सेनेचे खालील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यात प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय जिवा सेना प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुधीर महाले , जिवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा सचिव प्रा.डॉ. नरेंद्र महाले, जिवा सेना कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, महिला जिल्हाध्यक्षा कोकिळा चित्ते, अनिता आंबिकार, ज्योती बोरनारे, जिल्हा निरीक्षक किरण नांद्रे, जिल्हा समन्वय समिती प्रमुख किशोर श्रीखंडे, पूर्व विभागीय अध्यक्ष उदय सोनवणे, पश्चिम विभागीय जिल्हा उपाध्यक्ष राहुल जगताप, पूर्व विभागीय जिल्हा उपाध्यक्ष अनिल टोगे, उत्तर विभागीय जिल्हा उपाध्यक्ष गणेश शेट्टी, उत्तर विभागीय जिल्हा संपर्कप्रमुख दिनेश जगताप, पूर्व विभागीय जिल्हा संपर्क प्रमुख सुनील श्रीखंडे, जिल्हा सह सचिव संजय सोनवणे, शहर कार्याअध्यक्ष विशाल कुवर, शहर सचिव विजय कुवर, सह उपाध्यक्ष राहुल नेरपगारे, जिल्हा संघटक सुरेश ठाकरे, तालुकाध्यक्ष जिवन बोरनारे, मनोज सूर्यवंशी, कायदे विषयक सल्लागार ॲड.राजू बोरणारे, भुसावळ कार्याध्यक्ष विनोद आंबेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.