<
जामनेर(शांताराम झाल्टे)- महाराष्ट्र शासनाने राज्यातील अपंग व दिव्यांग नागरीकांना महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या एस.टी. बसेस मध्ये प्रवास करण्यासाठी (वन फोर) म्हणजे काही प्रमाणात सुट मिळावी यासाठी ओळख पत्र देण्यात आलेले आहे.
परंतु जामनेर शहरात नव्हे तर तालुक्यात असे जास्त रक्कम घेऊन बनावट ओळखपत्र बनवुन देण्याचा गैर धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची गुप्त माहिती जामनेर पोलीसांना मिळाली. कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अधिकार नसतांना शासनाचे आर्थिक नुकसान व्हावे म्हणुन अपंग व दिव्यांग नागरीकांचे राज्य परीवहन मंडळाचे बनावट ओळखपत्र बनवुन तो महसुल शासनाच्या तिजोरीत न जात असल्याने ती शासनाची एक प्रकारे लुट होत आहे. अशा प्रकारे गुप्त माहितीच्या आधारे जामनेर पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पो.नि.किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीसांनी एका डमी ग्राहकाच्या मार्फत बनावट ओळखपत्र बनविण्याचे सांगण्यात आले.
सदर टोळीतील पंटर हा जामनेर नगर परीषदे जवळ ओळखपत्र घेऊन उभा राहिला पोलीसांकडुन योग्य प्रकारे सापळा रचण्यात आल्याने तो पंटर अलगद पकडला गेला. सदर आरोपी शे.अब्दुल्ला शे.अमीन रा.घरकुल जामनेर, गोपाल विनायक सोनार रा.जामनेर पुरा असे असुन या दोघांना अटक करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींच्या घराची छानबिन्नी केली असता कागद पत्रांसह इतर मुद्देमाल व अपंग, दिव्यांगांचे बनावट ओळखपत्र हस्तगत करण्यात आले.तसेच आणखी काही माहिती शक्यता वर्तवली जात आहे.
या दोन्ही आरोपींवर ३३९/२०२१ भा.द.वि. कलम ४२०,४००,४६५,४६८,४७१ कलमा नुसार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आज रोजी बोगस ओळख पत्र टोळी पकडण्यासाठी जामनेर API दिलीप राठोड,सहाय्यक पो.नि.किशोर पाटील, योगेश महाजन, सुनिल माळी,रियाज शेख, दिलीप वाघमोडे आदी जामनेर पोलिसांनी मोलाची कामगीरी बजावली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वांचे कौतुक केले जात असून पुढील तपास API दिलीप राठोड, सहाय्यक पो.नि.किशोर पाटील करीत आहे .