<
जळगाव(प्रतिनिधी)- औडाक्स इंडिया परिशियाई मार्फत नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या बीआरएम२ (ब्रेवेट्स दे रंडोनीऊर मंडियाक्स ) ६०० किमी लांब पल्ल्याच्या इंटरनॅशनल सायकलिंग इव्हेंटमध्ये जळगांव सायकलिस्ट क्लबच्या मेंबर आणि सुप्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग नोंदविला आणि यशस्वीरित्या पार पडला.
या इव्हेंटमध्ये ६०० किमी सायकलिंगसाठी ४० तासचा कालावधी देण्यात आला होता. डॉ अनघा यांनी २७ तास ४६ मिनिट ९ सेकंड, र्चेींळपस टाइममध्ये पुर्ण केले. ( एश्ररिीशव ढळाश – ३८ तास ४६ मिनिट १८ सेकंड ) रात्री २ तासाची झोप सुद्धा त्यांनी घेतली आणि दुसर्या दिवशीचा प्रवास पहाटे ६ वा. सुरू केला. डॉ. अनघा सुयोग चोपडे या जळगाव जिल्ह्यातील पहिलीच महिला सायकलिस्ट आहे. ज्यांनी ६०० किमी सायकलिंग इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला आणि यशस्वीरित्या पार पडली.
नांदेड येथील वाझिराबाद येथून सकाळी ६.४० ला इव्हेंटची सुरवात झाली. हैद्राबादच्या दिशेने सायकलिंगचा प्रवास सुरू झाला. बिलोली येथील मेडिकल सुप्रिटेेंडंट, मेडिकल ऑफिसर आणि ग्रामस्थ यांनी जल्लोषात सायकलिंस्ट्सचे स्वागत केले. मेडचल येथून पुन्हा परतीचा प्रवास केला आणि नांदेड क्लब येथे फिनिशर्स पॉईंटवर प्रवास संपवला. नांदेड सायकलिस्ट क्लबचे आयोजक आणि सायक्लीस्ट सदस्यांनी जल्लोषात पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून स्वागत केले. लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी जोरदार तयारी लागते.
त्याकरिता जेवणाचं आणि स्पोर्ट्स न्युट्रीशनचे मार्गदर्शन डॉ. सुयोग चोपडे यांनी केले. डॉ अनघा सुयोग चोपडे यांनी आतापर्यंत बीआरएम२- २००- २ वेळा, बीआरएम२ ३०० किमी आणि बीआरएम२्- ६०० किमी यशस्वीरित्या पार पडली आहे. यामधील बीआरएम२ ४०० किमी बाकी आहेत, त्या करिता त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.