Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसह एमएचटी- सीईटी परीक्षेसाठी मनाई आदेश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
20/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- दहावी, बारावीसह एमचटी- सीईटीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर 2021 व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी ) लेखी परीक्षा 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. तसेच 2021-22 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषधीनिर्माण शास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने 20 ते 25 सप्टेंबर 2021 या कालावधीत PCM ग्रुप व 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत PCB ग्रुपची परीक्षा जळगाव शहरात सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 प्रथम सत्र व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 व्दितीय सत्र, अशा या दोन सत्रात जळगाव शहरातील एकूण 6 परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी पोलिस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाहीत. परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एस. टी. डी/आय.एस.डी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्युर्टर दुकाने व ध्वनिक्षेपक पेपर सुरू असलेल्या कालावधीसाठी बंद ठेवावेत. सर्व संबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी काढण्यात येत आहे, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे पात्र लाभार्थ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

क्रीडांगण विकासासाठी मिळणार अनुदान, पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

क्रीडांगण विकासासाठी मिळणार अनुदान, पात्र संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo