<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- राज्यात महसूल मंडळस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणे व हवामान घटकांची आकडेवारी संकलनासाठी स्कायमेट वेदर सर्व्हिसेस व राज्य शासनाच्या सार्वजनिक- खासगी भागीदारीतू महावेध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत सद्य:स्थितीत उभारलेल्या २१०८ केंद्रातून तापमान, पर्जन्यमाप साक्षेप सार्द्रता वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान घटकांच्या Real Time माहितीची नोंद होत आहे.
या प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राव्दारे नोंदविलेली केंद्र स्थापनेपासून आज घडीला 365 दिवसांपूर्वीची कमाल व किमान तापमान सकाळी 8.30 वा व सायंकाळी 5.30 वाजेची सापेक्षा आर्द्रता, वाऱ्याचा झोत, व पर्जन्यमान या हवामान घटकांची दैनंदिन माहिती महावेध पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदरची माहिती https://servicemahavedh.com/mahavedh.portal/ या संकेतस्थळावर Historical data या शीर्षकाखाली जिल्हा, तालुका, मंडळ व 30 दिवसांचा अपेक्षित कालावधी निवडून पाहता येईल, असे मुख्य सांख्यिकी, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.