<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात कोविड -१९ साथीच्या संबंधित उद्भविलेल्या परिस्थितीत Oxygen plant या क्षेत्रात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर Oxygen plant अभ्यासक्रमाचा मुख्यमंत्री महा-आरोगय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी एकूण 30 जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
प्रशिक्षणास प्रवेश घेणेस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा पात्रता अशी : NTC (ITI) NAC Passed in Fitter / Welder / MMTM / RAC / Eiectrician / instrument Mechanic. AOCP /MMCP/IMCP Trade. प्रवेशासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे, Oxygen plant या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण घेण्यस इच्छुक उमेदवारांनी प्रसिध्द केलेले Google Foe भरण्यासाठी गुगल लिंक वर २६ सप्टेंबर २०२१ पर्यंत नांव नोंदणी करीत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.Google Form Link :- https://docs.google.com/forms/d/1DbwOLqnwH- HAdltjcP7zexj2pF9svz7nqCxmp-wq5fs/viewform?edit-requested=true अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.