<
जळगाव(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील मद्यव्यावसायिकांच्या १७ रोजी झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीस जिल्हाभरातील १२५ अनुज्ञप्तीधारक किरकोळ मद्य व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदविला.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदी ॲड. रोहन बाहेती, सचिवपदी पंकज जंगले, कोषाध्यक्षपदी डॉ.मणिलाल चौधरी, उपाध्यक्षपदी उदयदादा पवार, जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी राजेंद्रभाऊ चौधरी तर जळगाव शहर अध्यक्षपदी सतीश नारखेडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
बैठकीला शंकरअप्पा मराठे (जामनेर), सुरेश मराठे (पाचोरा), प्रमोद भंगाळे (भुसावळ), भडगाव येथील श्री.महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत नूतन पदाधिकारी निवडीनंतर व्यवसायात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना कशा कराव्यात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन असणे का गरजेचे आहे यावर सुनिल भंगाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अॅड.सत्यजित पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यवसायातील अडचणी तर सोडवायच्या असतील, तर एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पंकज जंगले, मनीष बाहेती, ललित पाटील, नितीन पंजाबी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन मनीष बाहेती यांनी तर आभार प्रदर्शन पंकज जंगले यांनी केले.