<
भडगांव-(प्रतिनिधी) – शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे . खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्ण सख्यां वाढत असल्याने प्रशासना कडुन या विरूध्द योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पावसाळ्यामुळे अनेक भागात गवत वाढले आहे. तसेच ठिकठिकाणी पावसाचे डबके साचलेले दिसते. परिणामी डासांचा उत्पंत्तीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
मोकळ्या प्लाँटच्या ठिकाणीही झुडपे वाढलेली दिसतात. शहरात मोकाट डुकरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो .या मोकाट डुकरांची विल्वेवाहाट नगरपालिके लावावी तसेच भटक्या कुत्र्यांना पकडले पाहीजे व गटारी मधील घाण काढुण फवारणी प्रत्येक गावात व शहरी भागात केली पाहीजे अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहे. नगरपालिका प्रशासनाने आरोग्य विभागाने भडगांव शहर व तालुक्यात उपाययोजना हाती घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.