Thursday, October 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई(प्रतिनिधी)- कोविड – १९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एल एम ओ) अर्थात तरल वैद्यकीय प्राणवायू कमी पडू नये यासाठी त्याची साठवणूक करून ठेवण्यासंबंधी राज्य शासनाने उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आज शुक्रवारी जारी करण्यात आली आहे.

या अनुसार राज्यातील सर्व एलएमओ उत्पादन करणाऱ्या कंपनी आणि प्राणवायू पुनर्भरण करणाऱ्यांनी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आपल्या क्षमतेच्या 95 टक्क्यांपर्यंत साठवणूक करावी आणि पुढील आदेश येईपर्यंत ऑक्सीजन साठ्यासंबंधी सदर अटीचे पालन करावे. यासाठी सर्व उत्पादकांना निर्देश देण्यात आले आहे की, त्यांच्या प्रकल्पामध्ये एल एम ओ उत्पादन पूर्ण क्षमतेने केला जात आहे या लक्ष द्यावे व शाहनिशा करून घ्यावी.जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करावी की, जिल्ह्यांमध्ये सर्व एलएमओ उत्पादक साठवणूक (दोन्ही, सार्वजनिक आणि खाजगी मध्ये) करीत आहे आणि जास्तीत जास्त प्राणवायू साठवणूकीची पातळी टिकून राहील. हे कार्य शक्य तेवढ्या लवकर सुरू करावे, असे ही निर्देश देण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाने वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढल्यात अ-वैदकीय ऑक्सिजनचा उपयोग योग्य पद्धतीने करावा असे ही पुढे म्हटले आहे.महाराष्ट्रामध्ये कोविड -१९ ची दुसरी लाट एप्रिल ते जून २०२१ दरम्यान कायम होती आणि या काळात सात लाख प्रकरणात १८५० मेट्रिक टन ऑक्सिजनाचा उपयोग करण्यात आला. वास्तविकता: हा सर्व वैद्यकीय प्राणवायू महाराष्ट्रामधील उत्पादकांकडूनच उपलब्ध होतो. कोविडची दुसरी लाट चालू असताना असे निदर्शनास आले की, अनेक उत्पादकांकडे ऑक्सिजनचा पुरेशा साठा नव्हता आणि मागणी पूर्ण करण्यात ते कमी पडत होते. या अनुभवाच्या आधारे संभावित तिसऱ्या लाटेच्या तयारीचा भाग म्हणून पुरेसा मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या दृष्टीने सदर उपाययोजना केल्या जात आहे.

वरील निर्देशांची अंमलबजावणी करताना राज्य पातळीवर अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त काम पाहतील तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी (महानगर पालिका क्षेत्र वगळून) आणि महानगरपालिका कार्यक्षेत्रात संबंधित महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून काम पाहतील तसेच सदर निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करतील. सदर सूचना या आदेशा च्या तारखेपासून लागू असेल आणि पुढील आदेश येईपर्यंत अंमलात असेल.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कलादालनातून मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन व्हावे -मुख्यमंत्री

Next Post

‘बार्टी’ कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील भावी अधिकाऱ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक

Next Post

‘बार्टी’ कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील भावी अधिकाऱ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

अनुभूती निवासी स्कूलमधील सीआयएससीई-१७ वर्षांखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

‘जलजीवन मिशन’च्या कामासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच, खासगी इसमासह तिघांना अटक!

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री

Private:

माहिती अधिकार सप्ताह निमित्त ९ ऑक्टोंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications