<
जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुका एज्युकेशन संस्थेचे संचालक मंडळाचे काही वर्षांपासून वाद सुरू होते. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा आ गिरिष महाजन व सुरेश धारीवाल, पारस ललवाणी यांच्या दोन गटात वाद असून आज दोन्ही गटाचे दोन संचालक मंडळ कार्यरतच्या पदावर आहेत. या वादामुळे शिक्षणाची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या शिक्षण संस्थेचे संचालक मंडळाच्या वादाने शिक्षण प्रेमीमध्ये नाराजी दिसून येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आबाजी नाना पाटील यांनी सन २००४ मध्ये संस्थेचा बदल अर्ज क्र. ६१४/२००४ हा दाखल केला होता. सदरील बदल अर्जबाबत मा.उच्च न्यायालय यांनी दि.२७/०४/२०१७ रोजी सर्व प्रलंबीत बदल अर्ज आठ आठवड्यात निकाली काढण्याचे आदेश दिले होते.
या आधी बदल अहवाल अर्ज क्र. ५९०/२००० हा गुणवत्तेवर दि. ३०/०१/२०२० रोजी निकाली निघाला आहे.सार्वजनिक विश्वस्थ अधिनियम १९५० चे कलम २२ प्रमाणे बदल झालेला असल्यास तो वैध व कायदेशिर असल्यास संबंधित मा.धर्मदाय उपआयुक्त यांनी स्विकार करून बदल अर्ज क्र. ६१४/२००४ अहवाल मध्ये नमुद केलेल्या गोष्टी खोट्या व चुकीच्या आहेत.
सदर बाबतीत दाखल केलेले कागदपत्रे सत्य आहे हे सादर करु शकलेले नाही ते बनावट आहे हे सिध्द झालेले आहे. दि.२८/०९/२००३ रोजीची सर्वसाधारण सभा झाली याचा पुरावा दाखल करु शकले नाही. सदरची सभा झालीच नाही त्यामुळे योग्य ते दस्तऐवज दाखल केले नाहीत. या अर्जास हरकतदार दिलीप विठ्ठल महाजन वगैरे ४ यांनी हरकती घेतल्या होत्या त्या हरकती मा.धर्मदाय उपआयुक्त जळगांव विभाग जळगांव यांनी ग्राह्य धरुन सदरचा निकाल दिलेला आहे.
हरकतदार यांच्या संमतीपत्रावर सह्या नसुन त्या बनावट सह्या आहे हे सिध्द झाले आहे.सदरील निकाल मा. धर्मदाय उपआयुक्त जळगांव विभाग जळगांव पिठासन अधिकारी श्री. जोशी साहेब यांनी दि.२१/०९/२०२१ रोजी पारीत केले असुन तो योग्य व कायदेशीर निर्णय दिला आहे.सदरील बदल स्वरुप हे सन २००३ ते २००८ या कालावधी पर्यंतचे असल्याचे नमूद जामनेर पत्रकार यांच्या बातमी द्वारे प्रसिद्धी करण्यात आले.