<
अमळनेर(प्रतिनिधी)- पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन ऑनलाइन वेबीनार घेऊन संपन्न झाला.
ऑनलाइन वेबिणार कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी एस पाटील होते, प्रमुख व्याख्याता म्हणून मखमलाबाद, नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाचे आर्ट्स व कॉमर्स महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.गोरक्षनाथ पिंगळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पारोळा समन्वयक प्रा.डॉ. जगदिश सोनवणे, माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्वेता वैद्य यांनी उपस्थिती होतें, डॉ. जगदीश सोनवणे यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या माध्यमातून आजवर केलेल्या कामाची माहिती प्रास्ताविकातून स्पष्ट केली, सुरुवातीच्या काळात काही विद्यापीठातच राष्ट्रीय सेवा योजना कार्यरत होती, मात्र आज भारतातील सर्वच विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना सक्रिय कार्यरत आहे.
प्रा. डॉ.श्वेता वैद्य यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाची सेवा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी सेवेसाठी तप्तर, निस्वार्थ सेवेची जाणीव व सामाजिक कल्याण, संस्कारशील जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली. विद्यार्थिनींनी देखील राष्ट्रीय सेवा योजनेत कार्य करीत आहे, सेवेची भावना ही सेवाव्रत म्हणून पुढे आली पाहिजे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विशेष संस्कारक्षम शिबिरात स्वच्छता, आरोग्य, वनराई बंधारा, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, डिजिटल कार्यशाळा, योग अभ्यास तसेच विविध मूल्य शिकविले जातात.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास, व्यवस्थापन कौशल्य, हार्डवर्क, मैत्री अशा विविधबाबींना विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आत्मसात करतात. विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना एक संधी आहे ती समजून घेतली पाहिजे व आत्मसात ही केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. एस. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी कोरोणा कालखंडात केलेल्या कार्याचा उल्लेख केला, विद्यार्थ्यांनी स्वतः देशभक्तीपर आणि देशसेवा करण्यास प्रोत्साहन निर्माण होईल असे गाणे गुणगुणले पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कार्य व जनजागृती यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका दिपाली किशोर पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी प्रयत्न केले.