<
एरंडोल(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता-वाचता यावे, तसेच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी याकरिता महाराष्ट्र राज्य शासन शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०१६मध्ये प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद द्वारे स्पोकन इंग्लिश प्रोग्राम ची सुरुवात करण्यात आली होती .त्यानंतर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापर्यंत सुमारे ३५हजार शिक्षकांना स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण फेस टू फेस देण्यात आले. स्पोकन इंग्लिश प्रशिक्षणासाठी ९०हजारापेक्षा अधिक शिक्षकांची मागणी लक्षात घेता एवढ्या मोठ्या संख्येने मागणी असणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण फेस टू फेस समोरासमोर स्वरूपात देणे आव्हानात्मक व आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होते .इंग्रजी भाषा ही ग्लोबल लॅंग्वेज म्हणून २१व्या शतकातील कौशल्य म्हणून शाळास्तरावर मुलांमध्ये रूजणे आवश्यक आहे त्याशिवाय आपल्या शाळेतील मुले येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामना करू शकणार नाहीत, या अनुषंगाने इंग्रजी भाषेच्या प्रशिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेता ब्लेंडेड किंवा ऑनलाइन स्वरूपाचा वेळेनुसार तांत्रिक कौशल्याचा वापर करून व उपलब्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन ज्ञान वअध्यापनाची नवीन कौशल्य सहज शिकणे सुलभ होईल आणि त्याचा वापर वर्गातील शंभर टक्के मुले शिकण्यासाठी करतील अशी व्यवस्था तयार करून शिक्षकांना उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते विद्यार्थ्यांना इंग्रजी मध्ये बोलता आणि वाचता यावे यासाठी माननीय अप्पर मुख्य सचिव यांचे मार्गदर्शनाखाली स्पोकन इंग्लिश मुक MOOC ऑनलाईन कोर्स चा पथदर्शी अभ्यास क्रम तयार करण्यात आला आहे.
हा संपूर्ण ऑनलाईन कोर्स सहा ते आठ आठवड्यात पूर्ण करावयाचा असून हा कोर्स सर्वप्रथम महाराष्ट्र शासन टाटा ट्रस्ट ब्रिटिश कौन्सिल च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या तेजस प्रकल्पामध्ये समाविष्ट असणाऱ्या टॅग टीचर्स शिक्षकांसाठी राबविण्यात येत असून एरंडोल तालुक्यातील कासोदा ,एरंडोल उर्दू ,एरंडोल मराठीच्या शिक्षकांसाठी उद्या दिनांक ३१शनिवार रोजी गटसाधन केंद्रातील सभागृहात एरंडोल येथे मोठ्या थाटात उद्घाटन होत आहे . एरंडोल तालुक्यातून तेजस प्रकल्पांतर्गत टॅग कॉर्डिनेटर म्हणून निवड झालेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गालापूर येथील उपक्रमशील आदर्श शिक्षिका जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी नुकतेच शासनाच्या या पथदर्शी ऑनलाईन उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण केले असून तालुक्यातील तीनही केंद्रांना त्या मूक कॉर्डिनेटर च्या भूमिकेतून ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे ऑनलाइन स्पोकन इंग्लिश चे धडे देण्यात येणार असून स्पोकन इंग्लिश मुक साठी आप आपल्या जिल्ह्यातील टॅग कॉर्डिनेटर हेच मुक कॉर्डिनेटर म्हणून काम करणार आहेत त्यामुळे त्यांना ऑनलाईन राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे माध्यमातून तालुकास्तरावर नियोजन आणि संचलन करण्यासाठी ५ते १४ऑगस्ट दरम्यान प्रस्तुत प्राधिकरणात प्रशिक्षित करण्यात आले .सदरील स्पोकन इंग्लिश ऑनलाइन कोर्समुळे जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय संदर्भात आत्मविश्वास वाढवण्यासाठी लाभ होणार आहे याकरिता निवड झालेले प्रथम टप्प्यातील केंद्र एरंडोल मराठी , केंद्र एरंडोल उर्दू ,आणि कासोदा केंद्रातील टॅग टीचर्स यांचे मूक ओरिएंटेशन मीटिंग उद्या दिनांक ३१ शनिवार रोजी सकाळी आठ वाजता एरंडोल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटसाधन केंद्राच्या सभागृहात जिल्हा शिक्षण व्यावसायिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या इंग्रजी विभागाच्या प्रमुख ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रकल्पाच्या जिल्हाप्रमुख डॉ.विद्या बोरसे अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी एरंडोल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विस्ताराधिकारी विश्वास पाटील, जे डी पाटील, केंद्रप्रमुख रवींद्र लाळगे,नारायण बोरसे,अल्लाउद्दीन शेख, किशोर पाटील कुंझरकर ,योगेश कुबडे आदींसह सर्व गटसाधन केंद्र साधन व्यक्ती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, सदरील पथदर्शी उपक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री ना.आशिष शेलार, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.वंदना कृष्णा, शालेय शिक्षण आयुक्त डॉ.विशाल सोळंकी, आदींच्या सखोल मार्गदर्शनाची साथ आहे.प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद चे संचालक डॉ.सुभाष कांबळे, डॉ.उज्वल करवंदे, डॉ.रणजीत देशमुख,डॉ.प्रमोद कुमावत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी.एन.पाटील जि.प.शिक्षणाधिकारी डॉ.डी.एम. देवांग, डी.आय.सी.पी.डी. प्रा. डॉ.मंजुषा क्षीरसागर, डॉ.उज्वल करवंदे,अमृता भालेराव आदींचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.