<
जामनेर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोदावरी फाऊंडेशनच्या सहकार्याने तालुक्यातील गारखेडा येथे नागरीकांसाठी मोफत कोविड 19 लसीकरण भाग १ची सुरुवात अरविंद बंगालसिंह चितोडीया यांच्या वतीने करण्यात आले असून कोरोना लसीकरणाचा हा पहीला व दुसरा टप्पा गारखेडा परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला. यावेळी वाघारी बेटावद जिल्हा परिषद गटाचे अरविंद सिंह चितोडीया, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड, प्रल्हाद बोरसे, दिपक माळी, विलास राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.