Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युवतीसेनेच्या तालुका प्रमुख पदी स्नेहल पाटील यांची नियुक्ती

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
28/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
युवतीसेनेच्या तालुका प्रमुख पदी स्नेहल पाटील यांची नियुक्ती

जामनेर(शांताराम झाल्टे)- तालुक्यात शिवसेना वाढीसाठी वरिष्ठ पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न स्थानिक पदाधिकाऱ्यांना केले जात आहे. तालुक्यात वरिष्ठांचे दौरे वाढत आहेत याचेच फलित की काय दिवसेंदिवस अनेक तरुण शिवसेनेत सामील होतांना दिसत आहेत. आता शिवसेना,युवासेना, महिला आघाडी बरोबरच युवतीसेनेसाठी तालुक्यातील शिवसेना जोरात कामाला लागली आहे.

युवतीसेनाच्या विस्तारासाठी युवासेना कोअर कमिटी सदस्य शितल देवरुखकर-शेठ या जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यांनी स्थानिक युवतींचे प्रश्न जाणुन घेतले.पक्ष वाढीसाठी उपाययोजना सांगत नव तरुणींना मार्गदर्शन देत बाळकडू पाजले.

यावेळी युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या सुचनेनुसार शितल देवरुखकर शेठ यांनी युवतीसेना जामनेर तालुका प्रमुख पदी कु.स्नेहल सुनिल पाटील यांची नियुक्ती केली.

स्नेहल पाटील या नांद्रा प्रलो ग्रा.पं.ला निवडुन आलेल्या जिल्ह्यात सर्वात कमी २१ वर्ष वयाच्या ग्रा.पं.सदस्य असुन बीएस्सी झुलोजी असे उच्च शिक्षण घेत आहेत. जामनेर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील तरुणीला हक्काचं व्यासपीठ मिळवून देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरा पर्यंत पोहचवुन युवतींना एक दिशा मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध असेल असे स्नेहल पाटील यांनी सांगितले.

नियुक्ती पत्र देतांना युवासेना युवती विस्तारक धनश्री कोलगे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील, सरिता माळी-कोल्हे, डॉ.प्रियंका वैभव पाटील हे उपस्थित होते. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील,आ.लता सोनवणे,महापौर जयश्री महाजन,शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Team Satymev Jayate

Previous Post

अरविंद चितोडीया यांच्या वतीने गारखेडा येथे मोफत लसीकरण संपन्न

Next Post

चला खेळू या शब्दांशी; प्रगती माध्यमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम

Next Post
चला खेळू या शब्दांशी; प्रगती माध्यमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम

चला खेळू या शब्दांशी; प्रगती माध्यमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo