Thursday, September 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यात सर्वांना एकाच निकषावर एकसमान मदत करणार; कुणावरही अन्याय होणार नाही -मंत्री छगन भुजबळ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
संभाव्य तिसरी लाट व गणेशोत्सव काळात मोहीम स्तरावर लसीकरण करावे -पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असून मोठ्या प्रमाणावरचे क्षेत्र पूरग्रस्त झाले आहे. राज्यात सर्वच ठिकाणी एकाच निकषावर पूरग्रस्तांना समसमान मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न असून कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ते आज लासलगाव परिसरातील व्यापारीशेड, लासलगाव ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थान तसेच भरवस फाटा येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करतांना नागरीकांशी संवाद साधतांना बोलत होते. यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लालसगावचे सरपंच जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, लासलगाव बाजार समितीचे संचालक नंदकुमार डागा, संदिप दरेकर, प्रांतअधिकारी डॉ. अर्चना पठारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, हरश्चिंद्र भवंर, गुणवंत होळकर, पांडुरंग राऊत, विकास चांदर, मधुकर गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, आताच पूरग्रस्त कांदा व्यापारी शेड भेट दिलीअसनू तेथे 700 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. एकट्या निफाड तालुक्यात 110 मिलीमिटर इतका पाऊस झाला असून 47 गावे अतिवृष्टिने प्रभावित झाली आहेत. यासंदर्भात सर्वांना एकसमान निकषावर आधारीत मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असून शक्य तितक्या लवकर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तात्काळ पंचानामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.यावेळी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेटी प्रसंगी रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Team Satymev Jayate

Previous Post

९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

Next Post

ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे -जिल्हाधिकारी

Next Post
जिल्ह्यातील जातीवाचक गावांसह वस्त्यांची नावे बदलण्याची कार्यवाही तातडीने करावी; जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे -जिल्हाधिकारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo