<
विद्यार्थी व शिक्षकांचे हित लक्षात घेता राज्यातील इंग्रजी शाळा सुरु कराव्यात यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) च्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात आले होते. २७ सप्टेंबर पर्यंत शाळा उघडण्याची परवानगी नाही दिली तर ‘मेस्टा’ शी सलग्न असलेल्या १८ हजार शाळा सरकारच्या परवानगी शिवाय सुरू करु असा इशारा सरकारला देण्यात आला होता, त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री मा.ना. वर्षा गायकवाड यांनी पुढाकार घेऊन राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत तात्काळ बैठक घेऊन दि. ०४ ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा टप्प्या टप्प्याने सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबद्दल मेस्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून आभार मानले. यावेळी मेस्टा संघटनेचे कोषाध्यक्ष मनिष हांडे उपस्थित होते. याप्रसंगी विविध विषयांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली.
१) नवीन शाळांना तृटीची पुर्तता करण्याच्या अटीवर परवानगी द्यावी.
२)विकत घेतलेल्या किंवा भाडेपट्टयावर शासकीय जमिनीवर सुरु असलेल्या कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांना 25% चा थकित आरटीई फि परतावा त्वरीत वितरीत करण्यात यावा
३) इंग्रजी शाळा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे
४)) उर्वरित आरटीई फिपरतावा वितरीत करण्यात यावा
शासकीय स्तरावर प्रलंबित दर्जावाढ प्रकरणे निकाली काढणे
५) शुल्क नियंत्रण समिती रद्द करणे
६) पालकांना फी भरण्यासाठी सांगणे
७) आरटीई प्रतीपुर्ती रक्कमेचा कमी करुन प्रती विद्यार्थी ८०००/- केलेल्या फिपरताव्याचे परिपत्रक रद्द करणे
या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. व लवकरच मेस्टा संघटने सोबत ऑफीशियल बैठक बोलावली जाऊन सर्व समावेशक चर्चा घडवुन आणण्यासाठी संबधीत विभागाला कळवले.