<
जळगांव(प्रतिनिधी)- राज्यात वाचन चळवळ राबविणाऱ्या युवकमित्र परिवार या चळवळीमार्फत पुणे व पिपरी चिंचवड शहरात जुने नवे पुस्तके संकलन मोहीम राबविण्यात येत आहेत.नागरिकांनी वाचून झालेली अवांतर वाचनाची जुनी पुस्तके ‘एक गाव एक वाचनालय’ या उपक्रमासाठी दान करावीत असे आवाहन चळवळीचे सस्थापक प्रवीण महाजन,सचिन म्हसे,नरेंद्र उमाळे यांनी केले आहे.
वाचून झालेल्या जुन्या/नव्या कादंबऱ्या, कथासंग्रह, कवितासंग्रह, बालवाचनाची पुस्तके, स्पर्धा परीक्षा पुस्तके नागरिकांना दान करावयाची असल्यास ९५२९१२५३९६ या नंबरवर कॉल केल्यानंतर चळवळीचे स्वयंसेवक आपल्या घरी येऊन ही पुस्तके संकलित करतील. व राज्यातील ग्रामीण भागात वाचनालय नसलेल्या गावामध्ये स्थापन होणाऱ्या वाचनालयांना भेट देणार आहेत.१५ ऑक्टोबर ‘वाचन प्रेरणा दिनापर्यंत’ मोहीम चालणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या आपल्याकडील पुस्तके मोहिमेला भेट द्यावीत असे आवाहन करण्यात येत आहे.