<
जळगाव – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. तथापि, माहे सप्टेंबर-2019 महिन्याच्या पहिला सोमवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हणजेच मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर, 2019 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
माहे सप्टेंबर-2019 या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना लोकशाही दिनात आपले तक्रारी अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी मंगळवार, दिनांक 3 सप्टेंबर,2019 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुपारी 3 वाजेपर्यंत आपले तक्रारी अर्ज (न्याय प्रविष्ठ प्रकरणे वगळून) सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.