<
नाशिक(प्रतिनिधी)- भारतात 4 राज्य स्मार्टपूर प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र मध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधील 20 गावासोबत हा उपक्रम नोकियाच्या अर्थसाहाय्याने सेव्ह द चिल्ड्रन व सी.वाय.डी.ए यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येत असून याच प्रकल्प अंतर्गत शिक्षण, उपजीविका, शासकीय योजना, आथिर्क समावेशन व आरोग्य या घटकांना घेऊन काम करत आहे. या प्रकल्प अंतर्गत 20 गावामध्ये स्मार्टपुर केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
या सेंटरचे उदघाटन नाशिक जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान त्यांनी स्मार्टपूर प्रकल्प बाबत जाणून घेतले तसेच हा प्रकल्प ग्रामीण गावात आधुनिक सेवा प्रधान करण्यासाठी तसेच महिला,युवक व ग्रामीण भागातील समुदायाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे एक मध्यम आहे. याचा जास्त जास्त ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ मिळेल असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
तसेच सदर कार्यक्रम सिन्नर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, सी.वाय.डी.ए. चे संचालक प्रवीण जाधव, सेव्ह द चिल्ड्रनचे धनंजय दिघे, स्मिता निकम (पांगरी-बू सरपंच), बाबासाहेब पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश नेरपगार, भाऊसाहेब शेळके, मृणाली पिंपळकर, अक्षय चिने, विशाल बोबाटकर, ऋतुजा काळे, अविनाश सोनवणे, विकास म्हस्के, सोमनाथ पगार, सी.वाय.डी.ए. टीम तसेच पांगरी ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले.