<
जळगांव- सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव व धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
सदर वेबिनारमध्ये मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. स्मिता जोशी समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय, जळगाव ह्या होत्या, कार्यक्रमाचे निमंत्रण समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री योगेश पाटील हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकसेवक मधुकरराव चौधरी ही समाजकार्य महाविद्यालय जळगाव चे प्राचार्य डॉ. वाय. जी. महाजन होते, कार्यक्रम समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शाम दामू सोनवणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक सहायक आयुक्त श्री योगेश पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना ज्येष्ठ नागरिक यांना सामाजिक व मानसिक आधार देण्याचे आवाहन केले. डॉ स्मिता जोशी यांनी आई- वडील व जेष्ठ नागरिक यांचे चरितार्थ व कल्याणासाठीचे अधिनियम विसृत स्वरुपात मांडत असताना वृद्धांना आत्मसंरक्षण करण्याची गरज, भावनिक नात्यांची जोपासना आणि मानसिक आधाराची गरज असल्याचे मत व्यक्त केले. वृद्ध व्यक्तींसाठी घटनात्मक संरक्षण जरी दिले असले तरीदेखील आपण सर्वांनी त्यांच्या वयाचा, अनुभवाचा आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या वेळेचा हा सन्मान राखला पाहिजे.
ज्येष्ठ नागरिकांनी शारीरिक वयापेक्षा मानसिक वय हे टिकवून ठेवले पाहिजे, जेणेकरून मिळालेल्या आयुष्याचा पूर्ण सकारात्मक उपयोग करता येईल. ज्येष्ठ नागरिकांनी उतारवयात संयमी जीवन जगण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय.जी. महाजन यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा देत ज्येष्ठांनी उर्वरित आयुष्य अतिशय मन मोकळेपणाने स्वतःसाठी जगले पाहिजे असे सांगितले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग महाविद्यालयास दिलेल्या संधीबद्दल प्राचार्य यांनी आभार व्यक्त केले, सदर ऑनलाईन वेबिनार मध्ये दैनिक यावलचे श्री बाळकृष्ण वाणी, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाकरिता कार्यरत असलेल्या श्रीमती मीनाक्षी कोळी, जळगाव,अमळनेर, व चोपडा समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, शासकीय निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालन सहयोगी प्राध्यापक डॉ. शाम दामू सोनवणे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.नितीन बडगुजर यांनी मानले.