<
अमळनेर- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 1 ऑक्टोंबर 2021 सकाळीं 11:30 वा. एकरूखी ग्रामपंचायत, तालुका अमळनेर येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळ्नेर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष दादा भांडारकर, एकरूखी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती मनिषा भिल, उपसरपंच
श्री.सुरेश पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. पी एस पाटील NSS जळगांव जिल्हा समन्वयक डॉ मनिष करंजे
NSS पारोळा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. जगदिश सोनवणे चोपडा विभागीय समन्वयक प्रा.डॉ. संजय शिंगाणे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.अस्मिता सरवैया, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. श्वेता वैद्य, प्रा. डॉ.भरत खंडागळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. अनिता खेडकर, एकरूखी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अंगणवाडी कार्यकर्ते, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर, स्थानिक शाळेचे शिक्षक-शिक्षिका, मुख्याध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राम वाचन कट्ट्याचे उद्घाटन एकरुखी ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सरपंच श्रीमती मनिषा भील यांनी दीपप्रज्वलन करून केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.जगदिश सोनवणे यांनी केले तर प्रमुख अतिथींचे मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी एस पाटील यांनी ग्रामस्थांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यापीठाच्या या उपक्रमास शुभेच्छा देऊन महाविद्यालय पातळीवर राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम यशस्वी पणे राबविण्याचे आश्वासन दिले. चोपडा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. संजय शिंगाणे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावात येत्या तीन वर्षात होणाऱ्या कामकाजा बद्दल माहिती दिली, जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. मनीष करंजे यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धात्मक वातावरणात ग्रामीण भागातील युवक जर टिकवायचे असतील तर वाचाल तर वाचाल या म्हणीचा अर्थ स्पष्ट करून सांगितला.
अध्यक्षिय मनोगत मा.श्री सुभाष दादा भांडारकर यांनी उपस्थित ग्रामस्थ व स्वयंसेवकांना वाचना बद्दलची आवड निर्माण व्हावी, या बाबत विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या व्यतिरिक्त देखील ज्ञान असले पाहिजे आणि ते ज्ञान मिळण्यासाठी हा ग्राम वाचन कट्टा नक्कीच उपयोगी ठरेल. बहिणाबाईंच्या आयुष्यातील अक्षर ओळख नसलेली व्यक्ती आज विद्यापीठाच्या नामकरनापर्यंत जाऊन पोचली, म्हणून शैक्षणिक अभ्यासक्रम हा व्यक्तीला एका ध्येयापर्यंत पोहोचवतो, पण त्यासोबत अनुभवाचे शिक्षण देखील महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा व विभागीय समन्वयक यांनी एकरुखी ग्रामपंचायतीच्या कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा यांना जवळपास 150 पुस्तक भेट दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अस्मिता धनवंत सरवैया तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ श्वेता वैद्य यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अनिल वाणी (कार्यालयीन अधीक्षक) सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि एकरुखी गावाचे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.