<
जळगांव(प्रतिनिधी)- १ मे २०२१ ला सातारा जिल्ह्यातून स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार ही अराजकीय संघटना संघटनेचे संस्थापक दिपक कांबळे व राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव कमलेश शेवाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अमर बेंद्रे, वजीर शेख, राष्ट्रीय सरचिटणीस श्री. काशीकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत मोरे आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात या “गाव तिथे शाखा” हे ब्रीद घेऊन संघटनेच्या कामाला सुरुवात झाली. संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समाजातील अनेक लोक संघटनेला जुळून येऊन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात संघटनेच्या शाखा उघडत आहे.
यातच जळगांव जिल्ह्यातील अनेकांनी संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटनेचे सदस्य झाले आहेत. यामुळे रविवार दिनांक ३ रोजी जळगांव जिल्हा शाखेचे उद्घाटन होत असून आढावा बैठकीचे देखील आयोजन केले आहे.
प्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव कमलेश शेवाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अमरजी बेंद्रे, राष्ट्रीय सरचिटणीस वजीर शेख, राष्ट्रीय संपर्क प्रमुख धनश्री उत्पात, राष्ट्रीय निरीक्षक उमेश काशीकर, राष्ट्रीय महामंत्री निजाम पटेल, राष्ट्रीय सहसचिव रमेश व्हनमाने, राष्ट्रीय समन्व्यक रमेश जोशी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, समाज सेवक डॉ.शांताराम सोनवणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, किशोर पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा जागृती महाजन, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत मोरे, महिला प्रदेश प्रमुख कविता जाधव, महाराष्ट्र उपाध्यक्ष भरत नजन, सुशांत गुरवे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुशांत जावळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, उत्तर महाराष्ट्र सचिव सद्दाम पटेल, उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख पुष्पा पाटील, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोपान गावडे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश नरवडे, उत्तर महाराष्ट्र संघटक दिपक पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष हर्षल बोरसे, उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख अमेय कुलकर्णी, जिल्हा जनसंपर्क प्रमुख चेतन निंबोळकर, जळगांव जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत मोरे यांनी केले आहे.