<
जळगांव(प्रतिनिधी)- २ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. सत्य अहिंसेचा मंत्र देणारे महात्मा गांधी व आपल्या साध्या जीवनपद्धतीमुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो.
त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमाद्वारे हा दिवस साजरा केला. भित्तिचित्र बनवणे, स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा साकारणे, गांधीजींचे आवडते भजन म्हणणे, चरखा व खादीचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त करणे तसेच गांधीजीच्या जीवनातून मुलांनी घेतलेला आदर्श आपल्या भाषणातून सांगणे यासारखे विविध उपक्रम शाळेत राबविण्यात आले या उपक्रमांना मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.