<
सातारा(जिमाका)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी पुणे -मुंबई येथे जाऊ नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पाहिल्या व दुसऱ्या लाटेत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात सुविधा वाढविण्यावर शासनाने भर दिला. कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनचे महत्व सर्वांना पटले. रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून बाहेरील राज्यातूनही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.