<
जळगाव – (प्रतिनिधी) – एसएसबीटी महाविद्यालयात फिट इंडिया रन 2.0 झिरो उपक्रमाअंतर्गत क्रीडा सप्ताहाचे 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 दरम्यानआयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते२९ आॅगस्ट रोजी फिट इंडिया चळवळीला सुरुवात झाली होती. व्यायामाकरीता धावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. नियमीत व्यायामाकरीता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सवार्ना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी ‘फिट इंडिया’ अंतर्गत ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ चळवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापासून २ आॅक्टोबर पर्यंत राबविण्यात आली होती.
महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. जी.के पटनाईक यांनी केले होते. या उपक्रमाअंतर्गत ‘तुम्ही कुठेही, कधीही धावू/चालू शकता’. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीश: अनुकूल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे किंवा चालणे शक्य होते. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे किवा चालण्याची मुभा स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रेकिंग अप किंवा जीपीएस घड्याळचा वापर करुन धावलेल्या किंवा चाललेल्या अंतराचा मागोवा याद्वारे हा उपक्रम राबवला.
या उपक्रमअंतर्गत महाविद्यालयात धावण्या बरोबरच टेबल टेनिस, कॅरम,चेस या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे या उपक्रमास प्रतिसाद दिला. फिट इंडिया रन टू पॉईंट झिरो हा उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.के.पटनाईक, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत यांनी चेअरमन ऑफ स्पोर्ट्स डॉ. पी. जे शाह क्रीडा संचालक श्री जे बी सिसोदिया, प्रा. दिनेश पुरी प्रा. सी यु निकम आणि क्रीडा समिती यांचे कौतुक केले.