<
जळगाव(प्रतिनिधी)- देवता लाईफ फाउंडेशन नागपूर, भारत विकास परिषद, लायन्स क्लब आणि माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या सयुक्त विदयमाने रक्तदान जागरूकता अभियानार्तगत आज पार पडलेल्या रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
भारत विकास परिषद ही समाजसेवी संस्था असून सामाजिक व वैद्यकिय क्षैत्रात कार्यरत आहे. देवता फॉउंडेशन नागपूर ही कर्करोग रूग्णांकरीता कार्य करणारी संस्था असून २ ऑक्टोंबर पासून राज्यभर रक्तदान चळवळ राबवत आहे. १५ ऑक्टोंबर रोजी समारोप नागपूर येथे होणार आहे. तर ६ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे राज्यपालाची भेट घेणार आहे. याचाच एक भाग म्हणून आज ४ आक्टोबर रोजी शिवतिर्थ चौक येथे रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले यात ५० च्या वर दात्यांनी रक्तदान केले.
याचबरोबर काव्यारत्नांजली चौक येथे ३० दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास देवता लाईफ फाउंडेशन नागपूर अध्यक्ष किशोर बावणे, उपाध्यक्ष कु कस्तुरी बावणे, संचालक सारिका पेंडसे, धर्मपेठ महिला मल्टीस्टेट पतसंस्था अध्यक्ष निलीमा बावणे, रवीजी, भारत विकास परिषद जळगाव शाखेचे उमेश पाटील, कोषाध्यक्ष रविंद्र गांधी, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनिष मंडोरा, सचिव जगदीश जाखेटे, कोषाध्यक्ष विनोद भंडारी, लायन्स क्लब जळगाव महिला अध्यक्ष किरण गांधी, सचिव रोहीत अक्ष्रवाल, कोषाध्यक्ष रामकुमाजी वर्मा लायन्स क्लब गोल्डचे अध्यक्ष मनोज चांडक, सचिव गणेश तोतला, कोषाध्यक्ष मनोज मालू, भारत विकास परिषदचे योगश पाटील, रत्नाकर गोरे, जान्हवी खाडीलकर, सिमा महाजन, लायन्सचे राजकुमार कोगटा, उमेश झवर, सचिन जाखेटे, किशोर बेहरानी, सचिन राका, रितेश छोरीया, उमेश सैनी, मोहन छोरीया,माजी प्रांतपाल एच एन जैन, माधवराव गोळवलकचे जितेंद्र शाह, विरभुषण पाटील, अर्जुन राठोड इ उपस्थीत होते.