<
जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील समता नगर येथे जिल्हा विधि प्राधिकरण, जिल्हा वकील संघ, यांच्या सयुंक्त विद्यमाने तसेच नीर फाउंडेशन, युवाशक्ति फाउंडेशन, स्टूडेंट चॅरिटीच्या सहकार्याने विधी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर उपक्रमास व्यासपिठावर अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. काळे तसेच जिल्हा प्राधिकरणचे सचिव ए.ए.शेख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, नीर फाउंडेशनचे संस्थापक सागर महाजन, ॲड. विजय दर्जी हे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा न्यायालय परिसरातील विधी सेवा विभाग करीत असलेल्या व नागरिकांना उपलब्ध असलेल्या विविध सेवा प्राधिकरण मार्फत होत असलेल्या सामान्य न्याय कायदेविषयक मिळणाऱ्या मोफत सहाय्य यांची माहिती देण्यात आली. त्या सोबतच विविध योजना यांच्या बद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, प्रीतम शिंदे नीर फाउंडेशनचे अध्यक्ष भावेश रोहिमारे सौरभ जैन, आशीष सोनार, इरफान पिंजारी व पियुष तिवारी, संदीप सूर्यवंशी स्टुडन्ट चॅरिटी फाऊंडेशनचे सयाजी जाधव, दिनेश पाटील, अजय चव्हाण, सागर निकम, अजय चव्हाण, उमेश देशमुख प्रताप बनसोडे ,भिमराव सोनवणे ,अजय अडकमोल, भिकन ठाकरे, अनिल लोंठे उपस्थित होते. आरपीआयचे अध्यक्ष अनिल अडकमोल, सचिन अडकमोल, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, भिमराव सोनवणे, अजय अडकमोल, भिकन ठाकरे, संदिप तायडे आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी मणियार विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी निलेश बारी आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.