<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील हॉटेल इम्पिरिया येथे स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व शहरातील शिवतीर्थ मैदान येथे जिल्हा शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन करतेवेळी संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव कमलेश शेवाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अमर बेंद्रे, वजीर शेख, राष्ट्रीय सरचिटणीस श्री. काशीकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत मोरे आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच महिला शाखेचे उद्घाटन करतेवेळी जळगांव जिल्हा महिला उपाध्यक्षा शैला चौधरी, प्रवक्ता संगीता भामरे, सचिव संगीता चौधरी, संघटक भाग्यश्री लुंकड, तालुका महिला अध्यक्षा दिपाली धांडे, महिला जनसंपर्क अधिकारी रेखा जैन, महिला सह सचिव रेखा पंचभाई, शहर महिला उपाध्यक्ष काजल कोळी, भुसावळ तालुका महिला अध्यक्ष जयश्री इंगळे, जामनेर तालुका महिला अध्यक्ष उज्वला चवरे, रावेर तालुका महिला अध्यक्ष वर्षा पाटील, भुसावळ शहर महिला अध्यक्षा निरंजना तायडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीत गाव तिथे शाखा हे ब्रीद ठेऊन संघटनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक संघटनेला जुळून येऊन संघटनेच्या आतापर्यंत ४० शाखा उघडत आहे.तसेच शाखा उघडताना तालुक्यातील पोलीस अधिकारी हजर राहत आहेत. पोलीस मित्र संघटनेचे महत्व काय आहे ते समाजाला पटवून सांगत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात, गावात पोलीस मित्र असावा असे सुंदर मार्गदर्शन पोलीस अधीकारी शाखा उघडताना करत आहे.
आगामी काळात संघटना बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. तसेच पोलीस मित्रांना देखील येणाऱ्या दिवसात बंदोबस्तासाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहे. विविध सामाजिक उपक्रम घेणे, सामाजिक चळवळ सुरु ठेवणे असे अनेक उपक्रम संघटना आज रोजी घेत असून संघटनेला समाजातील अनेक जाती धर्मातील लोक व महिला जुळले असून संघटनेत कोणताही जाती भेद नाही किंवा राजकारण न करता फक्त समाजकारण हाच संघटनेचा मुळ हेतू आहे. असं आयोजित आढावा बैठकीत अध्यक्ष दिपक कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासचिव कमलेश शेवाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अमरजी बेंद्रे, राष्ट्रीय सरचिटणीस वजीर शेख, राष्ट्रीय संपर्क प्रमुख धनश्री उत्पात, राष्ट्रीय निरीक्षक उमेश काशीकर, राष्ट्रीय महामंत्री निजाम पटेल, राष्ट्रीय सहसचिव रमेश व्हनमाने, राष्ट्रीय समन्व्यक रमेश जोशी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा जागृती महाजन, महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत मोरे, महिला प्रदेश प्रमुख कविता जाधव, महाराष्ट्र उपाध्यक्ष भरत नजन, सुशांत गुरवे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुशांत जावळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, उत्तर महाराष्ट्र सचिव सद्दाम पटेल, उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख पुष्पा पाटील, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोपान गावडे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश नरवडे, उत्तर महाराष्ट्र संघटक दिपक पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष हर्षल बोरसे, उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख अमेय कुलकर्णी, जळगांव जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.