<
• समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतन (सामाजिक न्याय विभाग)
• नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन करुन तेथे नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
• जुन्या पुणे-मुंबई रस्ता रुंदीकरणासाठी खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील संरक्षण विभागाच्या जमिनीच्या बदल्यात राज्य शासनाच्या मालकीच्या जमिनी संरक्षण विभागास वर्ग करणार.
(महसूल विभाग)
• महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन, १९८९ मध्ये सुधारणा
(मत्स्यव्यवसाय विभाग)
• किमान आधारभूत किंमत योजनेत २०२०-२१ मधील खरीप व रब्बी पणन हंगामात सीएमआर (तांदूळ) साठी वाहतूक खर्च देणार
(अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)
• मे. झोडियाक हिलोट्रॉनिक्स प्रा.लि. यांच्या वडाळा येथील सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्याकरिता मुंबई पोर्ट ट्रस्ट सोबत सार्वजनिक-खाजगी भागिदारी जमीन भाडेपट्ट्याच्या करारास मुद्रांक शुल्क व दंड माफ.
(महसूल विभाग)
• वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सक्षमीकरण करणार
संचालनालयाच्या स्तरावर ३३ पदे तसेच क्षेत्रीय स्तरावर दोन प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यासाठी २८ नवीन पदांची निर्मिती करणार
(वैद्यकीय शिक्षण विभाग)