<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल देशमुख सपकाळे यांची नियुक्ती अखिल भारतीय युवक महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री अजय पाटील व जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाविस्कर यांच्या हस्ते जळगाव महानगर प्रमुख या पदावर करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा अथक निरंतर प्रयत्न करू व त्यांना न्याय मिळवून देत राहू असा निर्धार करण्यात आला.